Silent Scars of the Flood: मराठवाड्यातील पूर आणि मानसिक आरोग्याची अदृश्य कहाणी
• दिसणाऱ्या विध्वंसापेक्षा खोलवर जाणारा परिणाम
मराठवाड्यात दरवर्षी पावसासोबत पूराचा धोका वाढत आहे. येथे, शेती वाहून जाते, घरं उद्ध्वस्त होतात, रस्ते तुटतात. किमान हे नुकसान डोळ्यांनी पाहता तरी, येते पण या आपत्तीपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसत नाहीत , ते म्हणजे लोकांच्या मानसिक आरोग्यावर होणारा खोल परिणाम.
तुटलेल्या भिंती पुन्हा बांधता येतात, पण भीती, नैराश्य आणि आशाहीनतेच्या जखमा मात्र शांतपणे मनात राहतात.
• पूरग्रस्त मानसिक आरोग्य: एक दुर्लक्षित संकट
पूरात प्रियजनांना गमावल्याने अनेक लोक गंभीर दुःखात बुडतात. काहींना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) होतो यामध्ये थोडासा पाऊस पडला तरी भीती वाढते. अनेक कुटुंबं भविष्याबद्दल अस्थिरतेच्या आणि नैराश्याच्या भावनांशी झगडतात. ग्रामीण भागात मानसोपचार तज्ञ नसतात आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलणं अजूनही लाजिरवाणं मानलं जातं. त्यामुळे लोक शांतपणे आतून तुटत राहतात.
![]() |
| पूर गेल्यानंतरही राहतात जखमा.. मनाच्या ! |
•मन सावरणं म्हणजेच खरी पुनर्बांधणी
Tele-MANAS: मानसिक आरोग्यासाठी मोफत मदत
📞 Tele-MANAS म्हणजे काय?
ही एक राष्ट्रीय स्तरावरील मानसिक आरोग्य हेल्पलाइन आहे जी कोणत्याही व्यक्तीला मोफत मानसिक आरोग्य सल्ला आणि समुपदेशन देते. प्रशिक्षित मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक फोनवरूनच तुमचं ऐकतात, मार्गदर्शन करतात आणि आवश्यक असल्यास पुढील उपचारासाठी मार्ग दाखवतात.
•Tele-MANAS हेल्पलाइन क्रमांक:
📞 14416 किंवा 📞 1800-891-4416
(भारतभर चालणारा मोफत हेल्पलाइन क्रमांक)
•मनाच्या जखमा ऐकण्याची वेळ आली आहे
प्रत्येक वाहून गेलेल्या घराची एक कथा असते, तसेचं, प्रत्येक थांबलेल्या अश्रूची आणि प्रत्येक थरथरणाऱ्या हाताचीही एक कथा असते. या कथांना ऐकणं, त्यांच्याशी संवाद साधणं पूरग्रस्तांना मानसिक आधार देऊ शकते मराठवाड्यातील पूर आपल्याला आठवण करून देतात की आपत्तीमधून सावरणं फक्त भौतिक वस्तूंचं नाही, तर मनाचंही असतं. कारण सगळ्यात खोल जखमा त्या असतात, ज्या कुणालाच दिसत नाहीत.
• निष्कर्ष
मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात मानसिक आरोग्य हा अजूनही एक दुर्लक्षित विषय आहे. ग्रामस्वराज्याच्या तत्त्वानुसार गाव स्वतःच्या बळावर उभं राहण्यासाठी मानसिकदृष्ट्या मजबूत असणं अत्यावश्यक आहे. पूराच्या वेदनेतून सावरण्यासाठी आणि पुन्हा आशेने उभं राहण्यासाठी आता मानसिक आरोग्याला केंद्रस्थानी आणणं ही काळाची गरज आहे.



Help line chalu aahe, khup chhan anubhav hota
ReplyDelete