Posts

Showing posts with the label शेतकरी समस्या

विकासाच्या प्रवाहात शेतकरी कोरडा का? | ग्रामस्वराज्य व पाणी व्यवस्थापन | Gandhi Gram Swaraj& Farmer Issues

Image
🌧️ प्रस्तावना आजकाल विकासाचं चित्र म्हणजे धरणं, सिंचन प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना आणि औद्योगिक वसाहती. पण या प्रवाहात शेतकरी मात्र कोरडा राहतो. पिकाला पाणी नाही, सिंचनाची सोय नाही, आत्महत्या थांबत नाहीत. मग प्रश्न असा - इतक्या विकासानंतरही शेतकरी सुखी का नाही? दै. लोकमतनुसार, सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरिपाची पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ६० लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्ये आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे, हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले, शेतं पाण्याखाली गेली, घर कोसळली, विहिरी बुजल्या. कधी दुष्काळ –कधी पूर, या दुहेरी संकटात शेतकरीच सर्वाधिक बळी ठरतो. इतके धरणं, विकास योजना, स्मार्ट सिटी प्रकल्प असूनही ग्रामीण भारत, विशेषतः शेतकरी अजूनही असुरक्षित का आहे, हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. याचं उत्तर शोधताना आज 'गांधी जयंती' दिवशी, गांधीजींच्या ग्राम-स्वराज्याच्या संकल्पना आणि आजच्या विकास प्रवाहातील विसंगती या दोन्हींचा विचार करणे क्रमपाप्त ठरते 🏞️ मराठवाडा पुराचे वास्तव आणि नियोजनाचा अभाव या वर्षी...