🌧️ प्रस्तावना आजकाल विकासाचं चित्र म्हणजे धरणं, सिंचन प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना आणि औद्योगिक वसाहती. पण या प्रवाहात शेतकरी मात्र कोरडा राहतो. पिकाला पाणी नाही, सिंचनाची सोय नाही, आत्महत्या थांबत नाहीत. मग प्रश्न असा - इतक्या विकासानंतरही शेतकरी सुखी का नाही? दै. लोकमतनुसार, सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरिपाची पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ६० लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्ये आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे, हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले, शेतं पाण्याखाली गेली, घर कोसळली, विहिरी बुजल्या. कधी दुष्काळ –कधी पूर, या दुहेरी संकटात शेतकरीच सर्वाधिक बळी ठरतो. इतके धरणं, विकास योजना, स्मार्ट सिटी प्रकल्प असूनही ग्रामीण भारत, विशेषतः शेतकरी अजूनही असुरक्षित का आहे, हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. याचं उत्तर शोधताना आज 'गांधी जयंती' दिवशी, गांधीजींच्या ग्राम-स्वराज्याच्या संकल्पना आणि आजच्या विकास प्रवाहातील विसंगती या दोन्हींचा विचार करणे क्रमपाप्त ठरते 🏞️ मराठवाडा पुराचे वास्तव आणि नियोजनाचा अभाव या वर्षी...
• दिसणाऱ्या विध्वंसापेक्षा खोलवर जाणारा परिणाम मराठवाड्यात दरवर्षी पावसासोबत पूराचा धोका वाढत आहे. येथे, शेती वाहून जाते, घरं उद्ध्वस्त होतात, रस्ते तुटतात. किमान हे नुकसान डोळ्यांनी पाहता तरी, येते पण या आपत्तीपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसत नाहीत , ते म्हणजे लोकांच्या मानसिक आरोग्यावर होणारा खोल परिणाम. तुटलेल्या भिंती पुन्हा बांधता येतात, पण भीती, नैराश्य आणि आशाहीनतेच्या जखमा मात्र शांतपणे मनात राहतात. पूरानंतर अनेक शेतकरी रात्री झोपू शकत नाहीत, त्यांच्या मनात एकच प्रश्न असतो – “पुन्हा सगळं वाहून जाईल का?” आई प्रत्येक ढगाकडे भीतीने पाहते, कारण तिला त्या रात्रीची पळापळ आठवते. लहान मुलं अजूनही झोपेतून किंचाळत उठतात. ही सगळी मानसिक जखमांची कहाणी कुठेही दिसत नाही, पण प्रत्येक घरात शांतपणे जगली जाते • पूरग्रस्त मानसिक आरोग्य: एक दुर्लक्षित संकट पूरात प्रियजनांना गमावल्याने अनेक लोक गंभीर दुःखात बुडतात. काहींना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) होतो यामध्ये थोडासा पाऊस पडला तरी भीती वाढते. अनेक कुटुंबं भविष्याबद्दल अस्थिरतेच्या आणि नैराश्याच्या भावनांशी झगडतात...
अंतर्मनातील सत्याचा प्रकाश✨ — स्वतःकडे जाण्याचा प्रवास — आपण दररोज बाहेरच्या जगात इतके गुंतून जातो की आपल्या आतल्या आवाजाकडे लक्ष देण्याचं भानच राहत नाही. यश, अपेक्षा, स्पर्धा, मान-सन्मान, इतरांची मते — या सगळ्याच्या गोंगाटात आपलं खरं स्वत्व हळूहळू झाकोळून जातं. आपण सतत काहीतरी मिळवण्यासाठी धावपळ करत असतो, पण या धावपळीत आपल्या अंतर्मनाशी असलेलं नातं तुटत जातं. बाहेर सगळं मिळाल्यासारखं वाटतं, पण आत रिकामपण जाणवतं. कारण शांततेचा, स्थैर्याचा आणि खऱ्या आनंदाचा स्रोत बाहेर नसून आत आहे. हाच आतला झरा म्हणजे अंतर्मनातील सत्याचा प्रकाश. हा प्रकाश कोणत्याही बाह्य साधनांमधून मिळत नाही. तो ना पुस्तकात सापडतो, ना इतरांकडून शिकवला जाऊ शकतो. कारण तो आपल्याच आत जन्माला आलेला असतो. हा प्रकाश कोणत्याही धर्म, सत्ता किंवा व्यक्तीवर अवलंबून नसतो. तो फक्त आपल्या अस्तित्वाचा एक निःशब्द, पण तेजस्वी भाग असतो. आपण कितीही गोंगाटात जगलो तरी, हा प्रकाश कधीच विझत नाही — फक्त आपण त्याकडे पाहणं विसरतो. अंतर्मनातील सत्य हे कोणतीही शिकवण, विचारधारा किंवा सिद्धांत नाही. ते एक अनुभव आहे. जेव्हा आपण थोडं थांबत...
Comments
Post a Comment