'जलीकट्टू'साठी...हू...तू...तू...!
मागच्या काही दिवसांत 'जलीकट्टू' पहायला मिळाला नाही...पण,त्यासाठी चालु असलेली हू...तू...त्तू...जरूर पहायला मिळाली.ही हू...तू...तू...म्हणजे राजकीय खेळी आणि राजकारणात कधीच काही विनाकारण होत नसते आणि जे होत असते त्यास एखादं गोंडस कारण पूढे केलं जातं.
जलीकट्टूसाठी परंपरेचं गोँडस कारण पूढे केलं गेलं... जलीकट्टू या पारंपारिक खेळामध्ये बैलांना सैराभैरा पळण्यास भाग पाडले जाते त्यासाठी कधी त्यांच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकले जाते तर कधी शेपटाचा चावा घेतला जातो जेणेकरून ते विचलीत होतील आणि खेळातील रंगत वाढेल...अशा विचलीत झालेल्या बैलावर स्पर्धकांना नियंत्रण मिळवायचे असते,शेवटी कुणाचातरी विजय होतो पण,येथे मानवता पराजित होते.
अशा या असंवेदनशील आणि अमानविय खेळावर सुप्रिम कोर्टाने,2014 च्या मे महिन्यात बंदी आणली होती.
तामिडनाडू राज्यात तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये,तोंडावर पडू नये यासाठी तेथील मुख्यमंत्री जयललिता यांनी केंद्राकडे जलीकट्टू सुरू ठेवण्यासाठी अध्यादेश आणण्याची मागणी केली होती तर, दुसरीकडे पर्यावरण मंत्रालयाने 7 जानेवारीला एक अधिसुचना आणून जलीकट्टू आणि बैलाशी निगडीत खेळांसाठी रस्ता मोकळा केला,या अधिसूचनेमध्ये बैलांशी निगडीत पारंपारिक खेळांत 2 कि.मी. पेक्षा लांब TRACK न वापरण्याची अट घातली आणि 'राजकीय स्वार्थाची' परंपराही जपली.
या अधिसूचनेविरोधात भारतीय पशू कल्याण बोर्ड, पेटा आणि एका एनजीओ ने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करून अशा पारंपारिक खेळामध्ये बैलांवर अत्याचार होतो तसेच प्रेक्षकांचाही जीव धोक्यात असतो म्हणून त्यावर बंदी कायम ठेवण्याची मागणी केली,या याचिकेच्या सुनावणीमध्ये सुप्रिम कोर्टाने पर्यावरण मंत्रालयाच्या 7 जानेवारी च्या अधिसूचनेला रद्द केले.
अशाप्रकारे जलीकट्टूचा जलजला जरी शमला असला तरी परंपरा आणि पर्यावरण यांचा समतोल राखणारा विचार अजून रूजला नाही.या दोन्हीमध्ये समतोल साधायचा असेल तर,
झाडे लावण्याची,हवा-पाणी शुध्द ठेवण्याची नवी परंपरा स्थापित करावी लागेल...
आपल्याला आजही बैलांना नियंत्रित करणारी परंपरा आठवते पण, मनातल्या अविवेकाच्या बैलाला नियंत्रित करणारी आत्मज्ञानाची परंपरा का आठवत नाही?..जेँव्हा आपल्याला या परंपरेची आठवण होईल कदाचीत तेँव्हा परंपरेचा खरा अर्थ कळेल...!
What do you think?
ReplyDelete