फ़ाशी:असावी की नसावी।
तारिख 30 जुलाई 2015,
सर्वञ याकुब मेमन च्या फाशीबद्दल चर्चा चालू होती,न्यूजवरील नेत्यांच्या प्रतिक्रीया ऐकून विविधतेमध्ये किती एकता आहे ते दिसून येत होते.
या स्थितीत प्रौढही विचलीत होतील तर,मग बालमनावर काय परीणाम होत असेल,या संदर्भात एक प्रसंग सांगावा वाटतो....
त्या दिवशी.(30जुलाई ) टी.व्ही.वर याकुब मेनन च्या फाशीवर वादविवाद पाहत होतो तेवढ्यात शेजारची पिंकी एक गोष्टींचे पुस्तक घेऊन आली व उत्साहाने म्हणाली,"दादा,तुला एक गोष्ट सांगू का?
माझा थंडा प्रतिसाद पाहून ती माझ्या शेजारी बसून वादविवाद पाहू लागली;पण शांतपणे टी.व्ही. पाहतील ती मुले कसली?...ती आतुरतेने विचारू लागली,"फाशी ,म्हणजे काय रे,दादा?"
ती शांत बसेल या आशेने मी पटकन उत्तरलो,"फाशी म्हणजे शिक्षा!..."
यावर तिचा दुसरा प्रश्न तयार होता,"गृहपाठ, नाही केला तर ही शिक्षा होते का?"
तिचा हा प्रश्न ऐकून मी नि:शब्द झालो व अडखळत म्हणालो,"नाही,आजुबाजूच्या माणसाला इजा केली तर,ही सजा होते!"
माझे उत्तर ऐकताच तिने हातातील पुस्तक उघडले अन् त्यातली एक गोष्ट दाखवत आतुरतेने विचारले,"पण,अंगुलीमालने तर खूपसाऱ्या माणसांना ईजा केली तरी त्याला फाशी नाय झाली?"
तिच्या या निरागस प्रश्नाचे परिपक्व उत्तर काय द्यावे हे समजत नव्हते;क्वचित थांबून
कसेतरी शब्द जुळवत म्हणालो,"अंगुलीमालला नाही पण,त्याच्यातल्या अपराध्याला फाशी झाली होती...!"
"म्हणजे,दोन अगुलीमाल होते की काय?"ती चकीत होऊन म्हणाली
"हो,प्रत्येकात चांगला अन् वाईट असे दोन अंगुलीमाल असतात!" मी समज देत म्हणालो तरी तिचे समाधान झालेले नव्हते कदाचीत आज तिचा शब्दसाठा अन् अनुभवातून येणारी समज कमी पडली असणार म्हणुनच तिला आज व्यक्त होता आले नाही पण, उद्या परिपक्व झाल्यास कदाचीत तिचा प्रश्न असेल,-याकुब मेमनला फाशी झाली पण आतंकवादाला फाशी कधी होणार...?"
?
,धर्माच्या नावावर होणारा अधर्म कधी थांबणार?
?
अमानविय अपराधाला मानविय पद्धतीनेही न्याय देता येईल का?
?
या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारला अन् समाजाला आत्तापासूनच शोधावी लागतील....!
Barobar aahe amol.....
ReplyDelete